Posts

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र 2018 कार्यक्रम, तुळजापूर

Image
Shri Tuljabhavani Navratra 2018 Tuljapur श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र 2018 कार्यक्रम , तुळजापूर दि . ०२ / १० / २०१८ ते २५ / १० / २०१८ पर्यंत साजरा होणारा शारदीय नवरात्र उत्सव या बद्दल माहिती . श्री तुळजाभवानीचे नवरात्र :- http://tuljabhavanipujari.com/ अश्विन शु . प्रतिपदा ते अश्विन शु . पौर्णिमा या कालावधीत श्री तुळजाभवानी देवीचे नवरात्र असते .  नवरात्र कालावधीत लाखो देविभक्त देविच्या दर्शन घेण्यासाठी तुळजापुरात दाखल होतात . श्री देवीने अश्विन शु . प्रतिपदा ते नवमी या कालावधीत महिशासूर या दैत्याचा पराभव केला त्या प्रसंगाची आठवण म्हणून नवरात्र उत्सव साजरा केला जातो . या उत्सवाची सुरुवात अश्विन शु . प्रतिपदापासून घटस्थापनेने होते व सांगता अश्विन शु . पौर्णिमेने होते . या कालावधीत अनेक देवीभक्त देवीचा उपवास करतात .  नवरात्र कालावधीत देवीच्या पादुकांची मंदिर आवारात मिरवणूक काढली जाते . त्यास छबिना / पालखी म्हणतात . तो पालखी सोहळा पाहण्यासाठी अनेक भक्त कवड्याची माळ धारण ...

तुळजाभवानीच्या मंदिराची रचना

Image
तुळजाभवानीच्या मंदिराची रचना   डोंगराच्या पश्चिम उतरणीवर हे देवास्थान असल्यामुळे मंदिराकडे जाण्यासाठी ९३ पायऱ्या उतराव्या लागतात. भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी पाय-या उतरल्यानंतर महाद्वार लागते. त्यावरील काही शिल्प हेमाड्पंथी असून तिथे नारद मुनींचे दर्शन घडते. पुढे गेल्यावर कल्लोळ तीर्थ लागते. देवी इथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली. तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तिर्थास धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला. यास्तव या तीर्थास ’कल्लोळ तीर्थ’ म्हणतात. स्नान कल्लोळ तीर्थाठायी।दर्शन घेई देवीचे॥ घेता चरण तीर्थोदय।होय जन्माचे सार्थक॥ या तीर्थापसून समोरच गोमुख तीर्थ लागते. त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो. त्याचप्रमाणे श्रीदत्ताचे हस्तप्रक्षालनाचे ठिकाण आहे. पूढे गेल्यावर अमृतकुंड लागते. त्याच्या अलीकडे गणेश मंदिर आहे. येथे सिद्धीविनायक आहे. नंतर निंबाळकर दरवाजा लागतो. दरवाजा ओलांडून आत गेले असता मातेचा कळस नजरेस पडतो. हा कळस पंचधातूपासून बनविला आहे. चौघडयाच्या पायऱ्या उतरल्यावर मंदिराचा प्रभार लागतो. देवीच्या मंदिराभोवती प्रशस्त आंगण, ओवऱ्या...

भोपे पुजारी घराण्यातील महिलांना भवानी मातेचा चरणस्पर्श अधिकार

Image
भोपे पुजारी घराण्यातील महिलांना भवानी मातेचा चरणस्पर्श अधिकार  श्री तुळजा भवानी मातेचे मुख्य 16आणे भोपे पुजारी वर्गांच्या मुली सध्या घेत असलेले सातासुमुद्रापार परदेशात MBBS यासारखे उच्च शिक्षण असोत की 17 व्या शतकापासून देविची सेवा, पराक्रम व समाजकार्य असो पण पुर्वपार रूढीपरंपरेनुसार देविच्या चरणावरती हळदीकुंकु वाहून चरणस्पर्श करण्याचा मान व अधिकार जो आहे तो मान खूप काही विशेष महत्त्व सांगून जातो.असा मान भोपे पुजारी यांच्या लग्न होवून गेलेल्या मुलीस व लग्न होवून आलेल्या सुनेलाच आहे.गावातील इतर महिलांना तो अधिकार नाही. भोपे पुजारी घराण्यातील महिलांचे यासाठी खूप मोठे योगदान आहे. त्या देविचे पावित्र्य ही पुर्ण निष्ठेने पाळतात. आपल्या मासिक पाळी असोत की घरातील वृध्दी व सुतक. वर्षातून दोन वेळा घरातील सर्व साफसफाई व रंगरंगोटी केली जाते. देविभक्तांचा नैवेद्य व जेवणाची व्यवस्था ही सतत करत असतात. देविला ज्या मानाच्या आरत्या व दररोजचा पहिला नैवेद्य(गोड भात)ही भोपे महिलाकडूनच केला जात असतो. देविने महिषाशूराशी युद्ध खेळून विजय मिळविला याचा आनंदोत्सव म्हणजे सिमोल्लंघन(विजया दशमी) सोहळा....

श्री तुळजा भवानी मातेचा पलंग

Image
श्री तुळजा भवानी मातेचा पलंग महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठा पैकी प्रमुख श्री तुळजा भवानी मातेच्या मंदिरात शेकडो वर्षापासून देविचे मुख्य 16 आणे भोपे पुजारी वर्ग व मंदिर संस्थान कडून अनेक वेगवेगळ्या प्रथा परंपरा, रिती रिवाज जपल्या जात आहेत. यातील एक देविला निद्रस्त होण्यासाठी असलेला पलंग. देवि वर्षातून 3 वेळा साधारण 19 ते 21 दिवस वेगवेगळ्या कालावधीत निद्रा घेत असते. देविचे मुख्य 16 आणे भोपे पुजारी आपल्या खांद्यावरून साक्षात देविची मुळ मुर्ती सिंहासनावरून उचलून पलंगावरती निद्रा दिली जात असते. या ठिकाणचे वेगळेपण हे की असा प्रकार इतर कोठेही दिसून येत नाही. तसेच इतर देवस्थानात एखादी वस्तू धार्मिक कार्यात वापरली तर ती एक तर ती वस्तू परत वापरात आणली जाते नाहीतर ती वस्तू मंदिरात सुरक्षितपणे भक्तांना पाहण्यासाठी ठेवली जाते. पण इथे मात्र तसे होत नाही तर प्रत्येक वर्षी देविचा पलंग सन्मानपुर्वक तोडून देविच्या होमकुंडात जाळला जातो, व परत दरवर्षी नविन पलंग मोठ्या थाटामाटात चिंचोडी पाटील, खुंटेफळ, सय्यदपीर व कुंडी गावचे काही ठराविक मंडळी घेऊन येत असतात. हा पलंग प्रत्येक्षात पुणे जिल्ह्यातील...

श्री तुळजाभवानी मातेचा अंगा-याचे महत्त्व

Image
श्री तुळजाभवानी मातेचा अंगा-याचे महत्त्व श्री तुळजा भवानी मातेच्या मंदिरात देविच्या दैनंदिन पुजामध्ये जेवढे हळदीकुंकुला महत्त्व आहे तेवढेच अनन्यसाधारण महत्त्व देविच्या अंगा-यालाही आहे. हिंदू धर्मशास्त्रानूसार अनादी काळापासून ऋषीमुनी, साधू, गोसावी व देविचे 16आणे भोपे पुजारी अंगाला भस्म/अंगारा लावूनच धार्मिक विधी करत असतात ही रूढी परंपरा आज आपणास पहावयास मिळते. भस्म महात्म्य,गुरूचरित्र,पद्मपुराण व शिवपुराण असे अनेक धार्मिक ग्रंथात भस्म व अंगाराबाबत माहिती मिळते. श्री तुळजा भवानी मातेची दररोज(सकाळ व संध्याकाळ)असा दोन वेळा अभिषेक पुजा होत असतात. या दोन्ही वेळा त्या दिवशी ज्या 16आणे भोपे पुजारी यांची देविची सेवा करण्याची पाळी असते तो सर्व प्रथम दोन्ही वेळेस अंघोळ करून यावेळी धोतर घातले जात नाही तर रेश्मी सोवळे नेसून देविच्या अलंकारगृहातील कोरडा अंगारा आपल्या डाव्या हातांवरती घेवून ओला करून उजव्या हाताच्या मधल्या तीन बोटांनी आपल्या कपाळावर,ह्रदयास,नाभी,बाहूसंधी,खांद्यावर, पोटावरून व पाठीवरती आडवा अंगारा लावला जात. यावेळी तो भोपे पुजारी आदिशक्तीये नमः असे मत्र म्हणत असतो.त्यामुळे भ...

आई तुळजाभवानीच्या देवघरातील टाक

Image
अनादी काळापासुन मानव आपल्या सभोवतालच्या अमर्याद निसर्ग शक्तींना देवताच्या रुपात पहात आला आहे व त्याचे विविध रूपातून पुजन करीत आला आहे. निसर्गाच्या या अमर्याद शक्तीचे पुजन करताना त्याने चराचरात देव पहिला व त्याला मूर्त रूप देवून त्याचे मंदिर उभारून पुजा करू लागला अश्या अनेक देव देवतांमधील कुलदैवतांचे स्थान त्याच दृष्टीने महत्वपूर्ण. या कुलदैवताचे स्थान निरंतर आपणा जवळ असावे व त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी या संकल्पनेतून कुलदैवतांचे टाकाची निर्मिती झाली दैवी वरदहस्त नेहमी आपल्यावर असावा हा त्या मागचा संकेत, त्यामुळे येथील घराघरात कुलदैवताचे टाक कुलाचाराने पुजले जातात. कुलदैवतांचे टाक धातू पासुन बनलेले असतात चांदीचे पत्र्यावर कुलदैवताची प्रतिमा उठावाने तयार केलेली असते पंचकोनी असलेल्या या टाकांचे मागील बाजुस राळ / लाख लावून मागील बाजुने तांब्याची पाठ बसवलेली असते हा संपूर्ण टाक जोड विरहित असावा असा संकेत आहे.  निसर्गाच्या मुळ तत्वातच दैवी अंश मानलेला असल्यामुळे या टाकांची निर्मिती ही याच संकेताचे आधारे केली जाते.  जीवन हे पंचतत्वा पासुन निर्माण होते व पंचतत्...

Durga Mata Rupa's

Image