भोपे पुजारी घराण्यातील महिलांना भवानी मातेचा चरणस्पर्श अधिकार
भोपे पुजारी घराण्यातील महिलांना भवानी मातेचा चरणस्पर्श अधिकार
श्री तुळजा भवानी मातेचे मुख्य 16आणे भोपे पुजारी वर्गांच्या मुली सध्या घेत असलेले सातासुमुद्रापार परदेशात MBBS यासारखे उच्च शिक्षण असोत की 17 व्या शतकापासून देविची सेवा, पराक्रम व समाजकार्य असो पण पुर्वपार रूढीपरंपरेनुसार देविच्या चरणावरती हळदीकुंकु वाहून चरणस्पर्श करण्याचा मान व अधिकार जो आहे तो मान खूप काही विशेष महत्त्व सांगून जातो.असा मान भोपे पुजारी यांच्या लग्न होवून गेलेल्या मुलीस व लग्न होवून आलेल्या सुनेलाच आहे.गावातील इतर महिलांना तो अधिकार नाही. भोपे पुजारी घराण्यातील महिलांचे यासाठी खूप मोठे योगदान आहे. त्या देविचे पावित्र्य ही पुर्ण निष्ठेने पाळतात. आपल्या मासिक पाळी असोत की घरातील वृध्दी व सुतक. वर्षातून दोन वेळा घरातील सर्व साफसफाई व रंगरंगोटी केली जाते. देविभक्तांचा नैवेद्य व जेवणाची व्यवस्था ही सतत करत असतात. देविला ज्या मानाच्या आरत्या व दररोजचा पहिला नैवेद्य(गोड भात)ही भोपे महिलाकडूनच केला जात असतो. देविने महिषाशूराशी युद्ध खेळून विजय मिळविला याचा आनंदोत्सव म्हणजे सिमोल्लंघन(विजया दशमी) सोहळा. साक्षात देविला 108 साडी नेसवून भोपे पुजारी नगरच्या मानाची पालखीत प्रथेनुसार बसवून मंदिर भोवती एक प्रदक्षिणा घातली जाते यावेळी काही भक्त देविवरती कुंकू व फुलांचा वर्षाव करीत असतात तर भोपे पुजारी महिला या लिंबलोण(भात,लिंबू,हळद,मिठ)चा वर्षाव करीत असतात. हा सिमोल्लंघन सोहळा इतका अलौकिक व नेत्रदिपक असतो की देविला कुणाची नजर लागू नये म्हणून लिंबलोण चा उपयोग भोपे महिलाकडून होत असतो.भोपे पुजारी घराण्यातील महिलांचा इतिहासात पाहिले तर अनेक गौरवास्पद प्रसंग समोर येतात. यात आवर्जुन उल्लेख करावा तो 17 व्या शतकातील त्र्यंबकजी नागोजीराव कदम भोपे यांची पत्नी भगवतीबाई हिचा.पतीच्या निधनानंतर संपूर्ण गावाची पाटीलकी मोठ्या धिराने सांभाळून अनेक समाजकार्य केलीत.सतत चा दुष्काळी भागावर मात करण्यासाठी व देविभक्तांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणुन मोठी बारव विहीर बांधली. आज ही या विहीरीचे पाणी पिण्यासाठी योग्य आहे हे विशेष. आज ही या विहीरीला भगवतीबाईच्या नावाने ओळखली जाते.याच भगवतीबाईच्या घरात छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांचा नातू रामराजे हे भाऊबंदकीच्या कारस्थानात बळी पडू नये यासाठी भोपे पुजारी यांचे बाळ म्हणून वाढले होते. हेच रामराजे पुढे छत्रपती शाहू महाराज यांच्या निधनानंतर सातारा गादीवरती आरूढ झाले होते. स्वराज्यातील सेनापती संताजी घोरपडे यांच्या घराण्यात कर्नाटकातील गजेंद्रगड येथे भगवंतराव कदम भोपे यांची नात गोजराबाई हिचा विवाह लावून दिला होता. तसेच मराठा साम्राज्याचा सेनापती ग्वाल्हेरचे महादजी शिंदे यांचा हि विवाह आनंदराव कदम भोपे यांची मुलगी कु. लक्ष्मीबाईशी झालेला.असे अनेक ऐतिहासिक प्रसंगावरून भोपे महिलांचे गौरवास्पद कर्तुत्व व योगदान पाहूनच की काय कधी ही न घडलेला प्रसंग यावर्षी घडून आला. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मा.गमेसाहेबांनी भोपे महिलांचा आदर व सत्कार केला. .....जगदंब ! जगदंब !! जगदंब !!!
Visit: http://tuljabhavanipujari.com/
Comments
Post a Comment