श्री तुळजा भवानी मातेचा पलंग

श्री तुळजा भवानी मातेचा पलंग


महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठा पैकी प्रमुख श्री तुळजा भवानी मातेच्या मंदिरात शेकडो वर्षापासून देविचे मुख्य 16 आणे भोपे पुजारी वर्ग व मंदिर संस्थान कडून अनेक वेगवेगळ्या प्रथा परंपरा, रिती रिवाज जपल्या जात आहेत. यातील एक देविला निद्रस्त होण्यासाठी असलेला पलंग. देवि वर्षातून 3 वेळा साधारण 19 ते 21 दिवस वेगवेगळ्या कालावधीत निद्रा घेत असते. देविचे मुख्य 16 आणे भोपे पुजारी आपल्या खांद्यावरून साक्षात देविची मुळ मुर्ती सिंहासनावरून उचलून पलंगावरती निद्रा दिली जात असते. या ठिकाणचे वेगळेपण हे की असा प्रकार इतर कोठेही दिसून येत नाही. तसेच इतर देवस्थानात एखादी वस्तू धार्मिक कार्यात वापरली तर ती एक तर ती वस्तू परत वापरात आणली जाते नाहीतर ती वस्तू मंदिरात सुरक्षितपणे भक्तांना पाहण्यासाठी ठेवली जाते. पण इथे मात्र तसे होत नाही तर प्रत्येक वर्षी देविचा पलंग सन्मानपुर्वक तोडून देविच्या होमकुंडात जाळला जातो, व परत दरवर्षी नविन पलंग मोठ्या थाटामाटात चिंचोडी पाटील, खुंटेफळ, सय्यदपीर व कुंडी गावचे काही ठराविक मंडळी घेऊन येत असतात. हा पलंग प्रत्येक्षात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका घोडेगाव येथे बनवला जात असतो तो मान शेकडो वर्षापासून तेथील ठाकूर घराण्याकडून मोठ्या श्रध्दापुर्वक पार पाडला जात असतो.पण मंदिर संस्थान कडून त्यांच्या उचित सन्मान राखला जात नाही ही खेदाची बाब आहे. हा पलंग दरवर्षी साधारण गोपाळकाळा ला तयार होत असतो तर बैलपोळाला घोडेगावातून निमदर्या, जुन्नर, नारायणगाव, कुमशेत, आळेफाटा, पारनेर, राजूरी, कान्हूर, केरी, वडझिरे, किन्ही, गोरेगाव, टाकळी, खातगाव जखणगाव, अहमदनगर, भिंगार, निंबोडी, सारोळा, कोल्हेवाडी, सांडवा, मांडवा, टाकळीकाझी, लोणी, दशमीगव्हाण, उक्कडगाव, खुंटेफळ, कोयाळ, चिंचोडी पाटील, खरड गव्हाण, कुंबेफळ, धानोरा, आठवड, नांदुर, धनगरवाडी, पुंडी, काकडेवाडी, बाळेवाडी, कडा, साबळखेड, चिंचोली, शेरी, जळगाव, आष्टी, कासारी, पांढरी, आष्टाफाटा, चिंचपूर, जामखेड, राजुरी, खर्डा, पाथरूड, भूम, आरसोली, आगळगाव, बाभूळगाव, दगडधानोरा, कारी, नारी, पुरी, आपसिंगा या मार्गे मोठ्या उत्साहात तुळजापूरात दस-याच्या आदल्या दिवशी शुक्रवार पेठेत पलंग व पालखी कट्ट्यावरती आणला जात असतो. दसरा ते कोजागिरी पोर्णीमा पर्यंत देविला याच पलंगावरती निद्रा दिली जात असते. निद्रा देण्या अगोदर देविचे मुख्य 16 आणे भोपे पुजारी हे देविला 108 साडी गुंडाळून देविची सुरक्षा करत देविला पालखीत बसवून देवी व देविभक्तासोबत शिम्मोलंघन खेळून पलंगावरती देविला निद्रा दिली जात असते. ठाकूर घराण्याकडून हा पलंग अहमदनगरच्या तेली समाजाचे पलंगे यांच्या मार्फत  हा पलंग तुळजापूरात आणला जात असतो शेवटची तुळजापूरातील मराठा समाजाचे पलंगे हा पलंग वर्षभर संभाळत असतात. ठाकूर, तेली व मराठा समाजाकडुन पलंगाची सेवा होत असते.

Visit: http://tuljabhavanipujari.com/

Comments

Popular posts from this blog

आई तुळजाभवानीच्या देवघरातील टाक

श्री तुळजाभवानी मातेचा अंगा-याचे महत्त्व