श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र 2018 कार्यक्रम, तुळजापूर

Shri Tuljabhavani Navratra 2018 Tuljapur श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र 2018 कार्यक्रम , तुळजापूर दि . ०२ / १० / २०१८ ते २५ / १० / २०१८ पर्यंत साजरा होणारा शारदीय नवरात्र उत्सव या बद्दल माहिती . श्री तुळजाभवानीचे नवरात्र :- http://tuljabhavanipujari.com/ अश्विन शु . प्रतिपदा ते अश्विन शु . पौर्णिमा या कालावधीत श्री तुळजाभवानी देवीचे नवरात्र असते . नवरात्र कालावधीत लाखो देविभक्त देविच्या दर्शन घेण्यासाठी तुळजापुरात दाखल होतात . श्री देवीने अश्विन शु . प्रतिपदा ते नवमी या कालावधीत महिशासूर या दैत्याचा पराभव केला त्या प्रसंगाची आठवण म्हणून नवरात्र उत्सव साजरा केला जातो . या उत्सवाची सुरुवात अश्विन शु . प्रतिपदापासून घटस्थापनेने होते व सांगता अश्विन शु . पौर्णिमेने होते . या कालावधीत अनेक देवीभक्त देवीचा उपवास करतात . नवरात्र कालावधीत देवीच्या पादुकांची मंदिर आवारात मिरवणूक काढली जाते . त्यास छबिना / पालखी म्हणतात . तो पालखी सोहळा पाहण्यासाठी अनेक भक्त कवड्याची माळ धारण ...