भोपे पुजारी घराण्यातील महिलांना भवानी मातेचा चरणस्पर्श अधिकार

भोपे पुजारी घराण्यातील महिलांना भवानी मातेचा चरणस्पर्श अधिकार श्री तुळजा भवानी मातेचे मुख्य 16आणे भोपे पुजारी वर्गांच्या मुली सध्या घेत असलेले सातासुमुद्रापार परदेशात MBBS यासारखे उच्च शिक्षण असोत की 17 व्या शतकापासून देविची सेवा, पराक्रम व समाजकार्य असो पण पुर्वपार रूढीपरंपरेनुसार देविच्या चरणावरती हळदीकुंकु वाहून चरणस्पर्श करण्याचा मान व अधिकार जो आहे तो मान खूप काही विशेष महत्त्व सांगून जातो.असा मान भोपे पुजारी यांच्या लग्न होवून गेलेल्या मुलीस व लग्न होवून आलेल्या सुनेलाच आहे.गावातील इतर महिलांना तो अधिकार नाही. भोपे पुजारी घराण्यातील महिलांचे यासाठी खूप मोठे योगदान आहे. त्या देविचे पावित्र्य ही पुर्ण निष्ठेने पाळतात. आपल्या मासिक पाळी असोत की घरातील वृध्दी व सुतक. वर्षातून दोन वेळा घरातील सर्व साफसफाई व रंगरंगोटी केली जाते. देविभक्तांचा नैवेद्य व जेवणाची व्यवस्था ही सतत करत असतात. देविला ज्या मानाच्या आरत्या व दररोजचा पहिला नैवेद्य(गोड भात)ही भोपे महिलाकडूनच केला जात असतो. देविने महिषाशूराशी युद्ध खेळून विजय मिळविला याचा आनंदोत्सव म्हणजे सिमोल्लंघन(विजया दशमी) सोहळा....